किल्ले हरिहर
पायथ्यापासून उंचच उंच दिसणारा कातळकडा आणि पायऱ्या, म्हणजे किल्ले हरिहर. उंच कातळकडा आणि दुर्ग भ्रमंतीचा थरार यांचा अनुभव घ्यायचा असेल तर, किल्ले हरिहर हे भ्रमंती करणाऱ्या दुर्गप्रेमींसाठी पर्यायी ठिकाण आहे. किल्ले हरिहरचं वैशिष्ट्य म्हणजे, या किल्ल्यावरजाण्यासाठी कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. पायथ्याच्या गावातून हरिहर आयताकृती भासतो.
किल्ले हरिहरच्या पायथ्याशी ‘हर्शवाडी’ नावाचे गाव आहे, त्यामुळे हरिहरगड हा ‘हर्शगड’ या नावाने देखील ओळखला जातो. हरिहरगडाचा आकार, कातळात कोरलेल्या पायऱ्या, किल्ल्यावरील गुहा आणि अवशेष हे इतर किल्ल्यांच्या तुलनेत वैविध्य दाखवणारे आहेत.
किल्ले हरिहरचा इतिहास : इतिहासातील
नोंदीनुसार समुद्र किनाऱ्यावरील बंदरांच्या
नोंदीनुसार समुद्र किनाऱ्यावरील बंदरांच्या
किल्ले हरिहर प्राचीन काळात बांधलेला किल्ला आहे. काही काळ अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात हा किल्ला होता. परंतु इ. स. १६३६ साली शहाजी राजांनी हा किल्ला जिंकून घेतला. परंतु त्यानंतर या किल्ल्यावर मोगलांनी ताबा मिळवला. इतिहासातील नोंदीनुसार इ. स. १६७०साली मोरोपंत पिंगळे यांनी किल्ले हरिहर जिंकून घेतला. शेवटी इ. स. १८१८ साली किल्ले हरिहर मराठयांच्या ताब्यातून इंग्रजांनी जिंकून घेतला.कंपनी सरकारचे इंग्रज अधिकारी किल्ले हरिहरच्या पायऱ्या बघून आश्चर्यचकित झाले होते. त्यावेळी इंग्रज
अधिकारी महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या वाटा आणि प्रवेशद्वार यांना तोफा लावून उद्ध्वस्त करत असत. परंतु किल्ले हरिहरच्या पायऱ्यांना इंग्रज अधिकाऱ्यांनी काहीच इजा केली नाही. यावरून या पायऱ्यांचे महत्व आणि आकर्षण किती जास्त प्रमाणात होते, हे लक्षात येते.



Comments
Post a Comment