दुर्ग भांडार नावाचा किल्ला
दुर्ग भांडार नावाचा किल्ला आहे हेच मुळी बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. त्र्यंबकगडाच्या
शेजारी असूनसुद्धा बरेच जण इथे जाण्याचे टाळतात. किल्ल्याच्या बाजूला नुसती टेकडी असेल, तर तिथे तटबंदी बांधा आणि तटबंदी बांधणे शक्य नसेल तर ती टेकडी उध्वस्त करणे, हा त्याकाळच्या दुर्गपतींचा आदेश आणि त्या हुकुमाची पुरेपूर अंमलबजावणी दुर्ग भांडार येथे जाताना येते.

दुर्ग भांडार आणि त्र्यंबकगड यांच्यामध्ये आहे अंदाजे २५०फूट लांब x ५फूट रुंद दगडी पूल. ब्रम्हगिरी पर्वतावर असलेल्या जटेश्वर मंदिराच्या मागून जाणारी पायवाट आपल्याला दरीच्या काठावर आणते. ह्या इथून एक वाट डावीकडे उतरते आणि सुरु होतो थरार. निर्माणकर्त्यांनी मऊ लोण्याला कापावे, त्याप्रमाणे दगडाला कापून खालती उतरणाऱ्या पायऱ्या खोदल्या आहेत. पायऱ्या संपल्यानंतर दरवाजा लागतो. पाहिल्याक्षणी आपल्याला वाटते, हा दरवाजा मातीत अर्धवट गाडला गेला असावा. पण तसे नाही आहे, त्याची रचनाच तशी आहे. हा दरवाज्यातून रांगत जावे लागते. दरवाज्यातून बाहेर पडल्यानंतर आपण दगडी पुलावर येतो. आता विचार करा, दुर्ग भांडार वरील एखादा सैनिक किती दुष्मनांचा खात्मा करू शकतो. दरवाज्यातून मुंडके बाहेर आले कि कर तलवारीचा वार. दगडी पुलावरून जाताना काळजीपूर्वक जावे लागते, कारण दोन्हीबाजूला आहे अंदाजे १०००फूट खोल दरी आणि वाऱ्याचा जोर पण ह्याठिकाणी जास्त असतो.
दगडी पूल संपल्यानंतर पुन्हा पहिल्या दरवाज्यासारखा दुसरा दरवाजा आणि दगडात कोरलेल्या पायऱ्या.पायऱ्या
चढून गेल्यानंतर आपला गडावर प्रवेश होतो गडाचा परिसर आटोपशीर असून गडावर घराचे दोन जोते आणि पाण्याची टाकी आहेत. गडाच्या उत्तरेला दगडी बुरुज आहे.
चढून गेल्यानंतर आपला गडावर प्रवेश होतो गडाचा परिसर आटोपशीर असून गडावर घराचे दोन जोते आणि पाण्याची टाकी आहेत. गडाच्या उत्तरेला दगडी बुरुज आहे.
गडावरून त्र्यंबकगड, त्र्यंबकेश्वर गाव, अंजनेरी किल्ला, हरिहर किल्ला यांचे उत्तम दर्शन होते. सातवाहन कुळातील श्रेष्ठ राजा गौतमीपुत्र सातकर्णी यांनी शकांवर मिळवलेल्या विजयाचे प्रतिक म्हणून गुढी उभारुन गुढीपाडवा साजरा केला जातो.
Comments
Post a Comment