एक चमत्कारिक जलाशय "लोणार सरोवर"
एक चमत्कारिक जलाशय "लोणार सरोवर"
पर्यटनाच्या नावावर आपण जगभरातल्या पर्यटन स्थळांना शोधत असतो, त्यासाठी वाट्टेल तेवढे पैसेही मोजतो. पण आपल्याच राज्यात काही असे पर्यटन स्थळ आहेत ज्यांना बघायला विदेशी पर्यटक देखील येतात. आम्ही असचं एक पर्यटन स्थळ आपल्यासाठी घेऊन आलो आहे. जिथे तुम्हाला विज्ञान, निसर्ग आणि संस्कृती या तिघांचाही मेळ बघायला मिळेल.
‘लोणार विवर’, महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर म्हणजे सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वी उल्कापाताने जो प्रचंड खड्डा पडला त्यातून निर्माण झालेला एक चमत्कारिक जलाशय. जागतिक कीर्तीचा हा लोणार सरोवर जागतिक पातळीवरचा तिसऱ्या क्रमांकाचा सरोवर आहे. लोणार या ठिकाणी एका मोठ्या आकाराचा अशनी पाषाण आढळून तेथे १८०० मीटर्स रुंदीचे व १७० मीटर्स खोलीचं एक ‘विवर’ तयार झालं. या विवराच्या ठिकाणी सध्या एक नयनरम्य असं खा-या पाण्याचं सुंदर सरोवर तयार झालं आहे.
या सरोवराचं भूगर्भशास्त्रीय सर्वेक्षण सर्वप्रथम १८२३ मध्ये सी.जे.ई. अलेक्झांडर यांनी केलं आणि त्यांनी आपल्या पृथक्करणात हे सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाल्याची नोंद केली. १८२३ पर्यंत सर्व लोकांचा असा समज होता, की या सरोवराच्या जन्माचा संबंध ज्वालामुखीचा उद्रेक असावा. जगात अशा प्रकारचे केवळ तीन सरोवर असल्या कारणाने ‘नासा’ ने देखील या सरोवराची दखल घेतली.
प्रा
चीनात या सरोवराचा उल्लेख ‘विराजतीर्थ’ किंवा बैरजतीर्थ असा केला जात असे. सत्ययुगात लोणार सरोवर वैरज तीर्थ या नावाने ओळखले जात असे. लोणासुराच्या कथेनुसार विष्णूने लोणासुराचा वध केला व या सरोवराच्या खोलगट भागात त्याचे दफन करण्यात आले. त्याच्या रक्तापासून सरोवरातील पाणी तयार झाले, अशी आख्यायिका आहे.
औरंगाबाद शहरापासून १५० कि.मी. अंतरावर बुलढाणा जिल्ह्यात असणाऱ्या या सरोवराच्या एका बाजूस स्वच्छ पाण्याची अखंड वाहणारी धार (झरा) असून त्या धारेचा उगम गंगे पासून झाल्याचे भाविक मानतात. तर दुसऱ्या बाजूस देवीचे मंदिर आहे. याशिवाय येथे सीताना हिनी व रामगया असे दोन झरे आहेत. या परिसरात अंदाजे बाराशे वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत.




Comments
Post a Comment